Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी 5 मे रोजी समितीचा जो निर्णय होईल तो मला मान्य; शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे रोजी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. 

शरद पवार म्हणाले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. 

शरद पवार पुढे म्हणाले की, 1 मे1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं 1 मे सोबत माझं वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. 

सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा? 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली, अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले होते.  निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत. 

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांच्या निर्देशानुसार ती 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे रोजी मिळणार आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल असं म्हटलं जातंय. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply