Sharad Pawar : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली मोदींच्या भाषणाची ती ऑडिओ क्लिप; महागाईवरून हल्लाबोल

Sharad Pawar : मोदींनी २०१४ साली पन्नास दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्के खाली आणणार, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गॅस ११०० रूपये झाला आहे. २०१४ साली मोदींनी बेकारी कमी करून हाताला काम देऊ असं सांगितलं होतं, परंतु बेकारी कमी झाली नाही. १०० पैकी ८७ तरुण बेकार आहेत, अशा शब्दांत शरद पवारांनी  मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत टीकास्त्र सोडलंय.

माढा येथे शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आजवर गॅस, वीज, तरुणांना रोजगार याबाबत दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप देखील पवारांनी भरसभेत सर्वांना ऐकवली आहे.

Ravi Rana Vs Bacchu Kadu : नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतलीय; रवी राणांचा गंभीर आरोप

ऑडिओ क्लिप ऐकवत दहा वर्षांत तुम्ही काय केलं? असा खरमरीत सवाल शरद पवारांनी मोदींना विचारला आहे. मी अनेक पंतप्रधान पाहिलेत. या सगळ्यांनी देशाचा विचार केला पण मोदी लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात. हा देश हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांचा आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, सोलापूमध्ये पालकमंत्री असताना आपण काय काय केलं हे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितलं. सोलापूरचा काही वर्षे मी पालकमंत्री होतो. त्यावेळी दुष्काळात लोकांना रोजगार दिला. दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी पाच लाख लोकांना मदत केली, असं शरद पवार म्हणाले.

मोदींच्या मनात आलं तर त्यांनी लगेच कांद्याची निर्यात बंद केली. साखर उत्पादनात महाराष्ट्र एक नंबर आहे. मात्र मोदींनी साखर निर्यात बंद केली. मोदी हे राज्य कोणासाठी चावलतात? असा सवाल देखील शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply