Sharad Pawar : शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही, मोदी फक्त विरोधकांवर टीका करतात: शरद पवार

Sharad Pawar : ''देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते, देशाचा प्रमुख जेव्हा जातो त्यावेळी त्यांनी देशाचे प्रश्न मंडण्याची त्यांची जबादारी असते. मात्र ते शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही, ते फक्त विरोधकांवर टीका करतात'', असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. आज जालन्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

मोदींवर टीका करत शरद पवार म्हणाले, ''आज शेकऱ्यांवर त्यांचा परिणाम झाला आहे. दिल्ली हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. एक वर्ष शेतकरी रस्त्यावर आले. हे सरकार त्यांना ढुंकूनही पाहत नाही.'' ते म्हणाले, ''जगामध्ये एक अंतरराष्ट्रीय संस्था ती अभ्यास कर्ते ती संस्था आज बेरोजगारी निर्माण करणारी भाजपा सरकार असल्याच म्हणत आहे.

Bus Fire News : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव; वऱ्हाडाची बस पूर्णपणे जळून खाक

ते म्हणाले, ''या सरकार ला सत्तेची मस्ती आहे. केजरीवालपासून जनतेचा विचार करणारे मंत्री नेते यांना तुरुंगात टाकल्या जात आहे. महाराष्ट्रात संघर्ष करणारे क्रांतिकारी नेते आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, हे या सरकारची दादागिरी सहन करणार नाही.''

शरद पवार पुढे म्हणाले की, ''इथेनॉल फायदायचं सांगतं होती, त्यामुळे सरकारला फायदा होणार होत. मात्र या सरकारच्या धोरणमुळे इथेनॉल टाकींमध्ये पडून आहे. शेतकरी संकटात आला तरी चालेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही भूमिका मोदी सरकारची आहे.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply