Sharad Pawar : शरद पवारांकडून राऊतांची पाठराखण! हक्कभंग कारवाईवर घेतला आक्षेप, म्हणाले; 'ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही'

Maharashtra Assembly Budget Session: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर यान वादाला सुरूवात झाली होती. सत्ताधारी पक्षांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला.

पण हक्कभंगाची पुढील कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीच अस्तित्वात नसल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच घाईघाईत हक्कभंग समिती स्थापन करण्याची धावपळ सरकार आणि विधिमंडळ स्तरावर सुरू झाली. या सगळ्या वादावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत स्थापन केलेल्या समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी होत असतानाच शरद पवार यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. याबद्दल बोलताना "लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते. तसेच गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी, संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो. हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे, यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधी ही समर्थनीय नाही. परंतु प्रकरण संयमाने हाताळावयास हवे," अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply