Sharad Mohol Case : शरद मोहोळ प्रकरणातील खरा मास्टरमाइंड सापडला? एका रात्रीतच पोलिसांना मोठं यश

Sharad Mohol Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चेहरा समोर आणण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलारसह दोघांना पनवेलमध्ये अटक केली आहे. याप्रकरणातील आणखी काही आरोपी आमच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गँगस्टर शरद मोहोळची ५ जानेवारी रोजी पुण्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आतापर्यंत २४ जणांवर पोलिसांनी  कारवाई केली असून यातील १५ जणांना अटकही करण्यात आली आहे.

Vasai Fire : वसईत कंपनीला भीषण आग, अर्ध्या किलोमीटरपर्यंत गेल्या आगीच्या झळा

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनेक कुख्यात गुंडाचा समावेश असल्याचं कळतंय. रविवारी रात्री अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चेहरा असल्याचा संशय पोलिसांना आहे.

आरोपी विठ्ठल शेलार हा गुंड गणेश मारणे टोळीचा सदस्य असल्याची माहिती आहे. त्याने २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याचंही सूत्रांकडून कळतंय. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

२०१४ मध्ये विठ्ठल शेलार याला मोक्काअंतर्गत अटकही झाली होती. दरम्यान, अटकेत असलेल्या एकून १५ आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार असून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply