Sharad Mohol : 'धर्माला न्याय देणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळावा. मोहोळ हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा

Sharad Mohol : पुणे शहरात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा निर्घुण हत्या करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आत्तापर्यंत १५ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अशातच शरद मोहोळ हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या असून पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मोठी मागणी करण्यात आली आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या...

शरद मोहोळ  हत्या प्रकरणात मिलींद एकबोटेंसह  हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली. तसेच शरद मोहोळची हत्या हा आंतराष्ट्रीय कट असून हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

Pune Bangalore National Highway : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आनेवाडी टाेल नाक्यावर ठिय्या आंदाेलन, पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतुक थांबली

पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप..

शरद मोहोळ हत्येच्या तपास प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही,पिस्तुल सापडला त्याचा तपास नाही, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

तपास राष्ट्रीय यंत्रणेकडे सोपवावा....

तसेच "शरद मोहोळ यांनी गोरक्षण चळवळ वाढवली होती. जर्मन बेकरी बॉंम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख कातील सिद्दीकी हत्या केली होती, त्यामुळे यामागे अतिरेकी संघटनांनी काही कटकारस्थान केलं का अशी शंका आहे. म्हणूनच मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडे सोपवण्यात यावा," अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली.

पुण्यात निघणार जनमोर्चा...

'देव, देश, धर्म याला न्याय देणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. हिंदुत्वविरोधी लोकांनी मारले आणि टोळीयुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हणत या प्रकरणी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारी २०२४ ला पुण्यात जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply