Shambhuraj Desai : शंभूराज देसाई यांना शिवीगाळ,शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल;

Shambhuraj Desai : सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात शिवसेनेच्या ग्रुपवर पोस्ट करून शंभूराज यांना शिवीगाळही केली. दरम्यान पाेलिसांनी या प्रकरणी काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना चुकीची माहिती देत असल्याचा तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी आरोप केला.शंभूराज देसाई यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

Political News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, 10 जानेवारीपर्यंत निकाल अनिवार्य

या पोस्टमुळे सातारा जिल्हा शिवसेनेत खळबळ माजली आहे. काकासाहेब जाधव यांच्यावर पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काकासाहेब जाधव यांची कराड तालुका प्रमुख पदावरूनही हाकलपट्टी होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *