Shahpur : ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड तरीही उपचार अन् शस्त्रक्रिया होणार मोफत; शहापूरमधील अनोखा उपक्रम


 

Shahpur : सध्या राज्याभरात शासकीय रुग्णालयात तंत्र डॉक्टर नसल्याने रूग्णालयाला उतरती कळा लागली आहे. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयात डॉक्टरांनी रूग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील गोरगरीब रूग्ण मोठ्या खाजगी रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही व उपचार ही त्यांना मिळत नाही यामुळे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने शहापूर तालुक्यात अत्याधुनिक असे हायटेक रूग्णालय उभारले आहे .

हे रुग्णालय जनतेसाठी 24 तास मोफत सेवा देणार आहे. महत्वाचे म्हणजे उपचारासाठी व शस्त्रक्रिया साठी येणाऱ्या रूग्णांकडे रेशनकार्ड व आधार कार्ड नसले तरी मोठ्यात मोठे शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे.

Bhusawal Crime : पोलीस असल्याचे सांगत गाडी अडविली; अडीच लाखाचे दागिने घेऊन पसार

लोकसभेच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे रिंगणात उतरले होते मात्र त्यांना यश आले नाही. शहापूर तालुक्यातील जनते साठी त्यांनी एक आश्वासन दिले होते. शहापूर तालुक्यातील जनतेसाठी मी 120 बेडचा हायटेक असा मोफत हाॅस्पिटल उभारेण आज त्यांनी देलेले आश्वासन पूर्ण केले व एक सुसज असा मोठा हाॅस्पीटल उभारले. या हाॅस्पिटलचे उद्घाटन मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे शहापूर तालुक्यातील जनतेला कोणतेही पैसे न खर्च करता औषधे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे मुंबई व ठाणे विभागात पहिला असे रूग्णालय झाले कि या रूग्णालयात पैसे भरण्याचे काउंटरच नाही या रूग्णालयात रूग्णांना हायटेक असा मोफत सेवा दिली जाणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या रूग्णांवर मोठ्यात मोठी शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत .

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply