Shahada News : शहादा तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा; मोलमजुरी करून बांधलेले घर कोसळले, आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर

Nandurbar : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा अजूनही सुरूच आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. यातच शहादा तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात झाडे उन्मळून पडली आहेत. तर मोलमजुरी करून उभारलेले घर पडल्याने आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. पडलेले घर पाहून वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.

नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. तर जिल्ह्यातील शहादा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड नुकसान झाले आहे. मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले असून अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडले तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

Monsoon Updates : राज्यात उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, आज मात्र महाराष्ट्राला हवामान खात्याचा अलर्ट

संसार पडला उघड्यावर चक्रीवादळाच्या तडाख्यात घरावरील पत्रे उडाली आहेत. तर आदिवासी कुटुंबाने मोलमजुरी करून बांधलेले घर देखील कोसळले आहे. शिवाय घरात पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले धान्यासह कपडे पाण्यात भिजले आहेत. आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. हे सगळे पाहून वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आदिवासी कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

बार्शी तालुक्यातील घराचं छत गेलं उडून

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील घराचं छत उडून गेले आहे. मुसळधार पावसामुळे तडवळे गावातील घरांचे छत पडले आहे. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यामुळे तडवळे गावातील ग्रामस्थांना रात्र पावसाच्या पाण्यात भिजून काढावी लागली आहे. दरम्यान घटनेला तब्बल १२ तास उलटून गेल्यानंतर देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पडझड झालेल्या घरांची पाहणी झालेली नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply