Shahada News : पाच लाख ५९ हजारांची दारू वाहनासह जप्त; म्हसावद पोलिसांची कारवाई

Shahada News :  पोलिसांकडून राज्य तसेच जिल्हा सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी सुरु आहे. या दरम्यान  गुप्त माहितीकडून मिळालेल्या माहितीवरून म्हसावद पोलिसानी  वाहनासह पाच लाख ५९ हजारांची दारू जप्त केली.

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत खेड दिगर (ता. शहादा) येथील  आंतरराज्य सीमा नाकाबंदी या ठिकाणी कारमध्ये अवैध दारूची चोरटी वाहतूक केली जात होती. याबाबतची खात्रीलायक माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांना कळवून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने खेड दिगर नाकाबंदी या ठिकाणी दोन पथकांनी सापळा रचला. 

Maharashtra Election : ५० वर्षात राहुल गांधींचं लॉन्चिंग झालं नाही; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

रात्री दहाच्या सुमारास चालक त्याच्या ताब्यातील वाहनात बिअर बॉक्स व चार लाख ५० हजार किमतीचे वाहन असा एकूण पाच लाख ५९ हजार ४४० रुपये किमतीच्या मुद्देमाल घेऊन जात असताना छाप्यात थांबविले असता तो पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सुनील पाडवी करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *