Mumbai and Thane : मुंबईसह ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय

School Closed in Mumbai : मुंबईसह ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

मुंबईला  रात्री ८ वाजल्यापासून अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला होता . मुंबई आणि ठाण्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. तर प्रशासनाने ठाण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे.

Pune Rain News : पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

ठाणे जिल्हा प्रशासनाने ठाण्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक) ही माहिती दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply