
Mumbai : इंग्रजी शाळांना देण्यात येणाऱ्या आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची कोट्यवधी रुपयांची थकित रक्कम कधी देणार? असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत विचारला. आरटीईसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्य शासनाने विना अनुदानित खाजगी शाळांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागेवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे शासनाकडून शाळेला दरवर्षी १७,६७० रुपये अनुदान दिले जाते. कोरोनामुळे मागील ३ वर्षे प्रति विद्यार्थी प्रति वर्ष ८ हजार रूपये अनुदान देण्याचे सरकारने निश्चित केले होते.
सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून पूर्वीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १७ हजार ७७० रूपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे का? असा प्रश्न विचारुन कोल्हापूर शहरातील काही शाळांना सदर अनुदान गेल्या तीन वर्षापासून शासनाकडून मिळालेले नाही, याकडे आमदार सत्यजित तांबे यांनी लक्ष वेधले.
|
|
या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती सन २०१७ पासून संबंधित शाळांना शासनाकडून न झाल्याने तसेच शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पोर्टलवर अर्ज सादर करताना २५ मार्चपूर्वीची कागदपत्रे असल्याची हमी देऊन अनेक पालकांनी या तारखेनंतरची कागदपत्रे काढल्याने तसेच राखीव ठेवलेल्या जागांवर अर्ज करताना पोर्टलवर अपलोड करण्याची सुविधा नाही, या कारणास्तव विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात येत आहेत, याकडे सत्याजीत तांबे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शाळा उदासीन असून आरटीई अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सुमारे १ लाख १ हजार जागांपैकी सुमारे ३०% जागा रिक्त राहत असल्याचे निदर्शनास आले का? ९ हजार ५३४ शाळांमध्ये आरटीई प्रवेश दिले जातात. त्यामध्ये ४ लाख विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे १ हजार ८०० कोटी रुपये थकवण्याची कारणे काय आहेत, तसेच सदर थकित रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


