Mumbai : कलाविश्वावर शोककळा! सुप्रसिद्ध अभिनेते सतिश शाह यांचं निधन, वयाच्या ७४व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Mumbai :  'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतिश शाह यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं आहे. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की, ते आता या जगात नाहीत. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

अशोक पंडित यांनी सतिश शाह यांच्या निधनाची माहिती दिली. अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की, आमचे प्रिय मित्र आणि हरहुन्नरी अभिनेते सतिश शाह यांचं काही तासांपूर्वी किडनी फेल्युअरमुळे निधन झालं. त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमच्या इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे. ओम शांती.'

Pune : फटाक्यांच्या वादातून भयंकर राडा; दोन कुटुंबांच्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू, अनेक जखमी

सतिश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या, पण 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मध्ये इंद्रवर्धन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानेप्रेक्षकांचं मन जिंकलं. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' हा एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कॉमेडी शो होता आणि आजही, त्यातील व्हिडिओ क्लिप्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सतिश शाह यांनी कल हो ना हो, जाने भी दो यारों, मैं हूं ना यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सतिश शाह यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला आणि त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचा अभ्यास केला आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

सतिश शाह यांनी १९७० मध्ये 'भगवान परशुराम' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण त्यांना खरी ओळख अरविंद देसाई यांच्या 'अजीब दास्तान' चित्रपटाद्वारे मिळाली. यानंतर त्यांनी गमन, उमराव जान, पुराण मंदिर, आशिक आवारा, कभी हान कभी ना, हम आपके है कौन, हम साथ साथ है, कहो ना प्यार है, मस्ती, मुझसे शादी करोगी, जाने भी माँ न हो, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *