Satara News : दुहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला, बहिण भावाचा मृत्यू, निंभाेरेत खळबळ

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंभोरे गावामध्ये दुहेरी खूनाची घटना घडल्याचे समाेर आले आहे. बहिण आणि भावाचा खून झाल्याने निंभाेरे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

फलटण ग्रामीण पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सीकाबाई तुकाराम शिंदे (वय 30) आणि सुमित तुकाराम शिंदे (वय 16) असे खून झालेल्यांची नाव आहे. हे दोघे भाऊ बहिण आहेत असेही पाेलिसांनी नमूद केले.

Thane News : मध्य रेल्वेत फटका गॅंग पुन्हा सक्रीय? मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय

या घटनेतील दोन्ही मृत पारधी समाजातील आहेत. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेची कसून चाैकशी सुरु आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पाेलिसांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply