Satara News : बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Satara News : सातारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाठार गावातील एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. चिमुकली सायंकाळी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी शोधाशोध केली. आज तिचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

संस्कृती रामचंद्र जाधव असे चिमुकलीचे नाव आहे. ही ५ वर्षीय मुलगी गुरूवारी सायंकाळी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी चिमुकलीचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही. नंतर कुटुंबाने कराड तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

Pune : स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर

चिमुकलीचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडू - कर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची नेमणुक करण्यात आली. ड्रोन,श्वान पथक आणि इतर साधनांच्या सहाय्याने रात्रभर शोधकार्य सुरू होते.

अखेर मध्यरात्री संस्कृतीचा मृतदेह गावातीलच एका शेतात आढळून आला. या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. चिमुकलीचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली? अपघात, घातपात की इतर काही, याचा तपास लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply