Satara : आधी पुण्यात ५ कोटी, आता साताऱ्यात एक कोटी; आचारसंहितामध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई

Satara : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील शेंद्रे येथे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची ही मोठी कारवाई केली. कारमधून हे पैसे घेऊन जात होते. हे पैसे कोणासाठी आणि कुठून घेऊन जात होते याचा तपास पोलिस करत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. पोलिस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. साताऱ्यामध्ये पोलिसांना एका कारमधून मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा त्यांना कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. हे पैसे नेमके कोणाचे आहेत याचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांनी ही कारवाई केली.

Pimpri Chinchwad : अधिकाऱ्याची गाडी दिली पेटवून; चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रकार

सोमवारी बुलडाणा शहर पोलिस शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासाणी करत होते. यावेळी एका दुचाकीमध्ये २० लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. तातडीने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. संबधित व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधी अहमदनगरमध्ये तब्बल २३ कोटींचे सोनं पोलिसांनी जप्त केले होते. शुक्रवारी संध्याकाळी सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी आणि  निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्ब्ल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट तसेच चांदी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेली कार ही पुण्यावरून संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ ही कारवाई केली होती. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. वाहन तपासणी दरम्यान पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. ही रक्कम सोलापूरमधील एका राजकीय नेत्याची असल्याची चर्चा सुरू होती. सध्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply