Satara Lok Sabha Election Results : उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली, निकाल घटिका समीप; उत्सुकता शिगेला

Satara : सातारा लोकसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागणार आहे. त्याला आता एकच दिवस उरल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य यात पणाला लागले आहे. निकालाला अवघे काही तास राहिल्याने कार्यकर्त्याची धाकधूक वाढली आहे. येणार तर आम्हीच, या विश्वासातून दोन्हीं बाजूच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

नुकत्याच आलेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही दावे-प्रतिदावे सुरू असून, कार्यकर्त्याबरोबरच नागरिकांमध्येही पैजांचा जोर वाढू लागला आहे. सातारा लीकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेस विचारसरणीसोबत राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यातील मतदार शरद पवारांसोबत भक्कमपणे उभा राहिला. मागील लोकसभा पोटनिवडणुकीतही ते दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे हक्काचा गड राखण्याचे आव्हान शरद पवार याच्यासमोर होते, त्यातच श्रीनिवास पाटील यांनी आजारपणामुळे माघार घेतली.

Loksabha Election Results : भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची तयारी! गिरगावमध्ये १० हजार बुंदीचे लाडू, तर दिल्लीत PM मोदींचा रोड शोच्या तयारी

दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांचे तिकीट भाजपकडून अंतिम होत नव्हते. त्यामुळे उमेदवार निवडीपासून या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेरीस उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांची नावे अंतिम झाली. त्यानंतर लढतीला खऱ्या अर्थाने धार आली. तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूच्या कार्यकर्ताना विश्वास आहे. त्यातूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. काहींनी बेतरही लावलेल. पेजच्या माध्यमातून दावा पक्का अगल्याचे दाखविले जात आहे.

साताऱ्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. काहींनी ध्वनिक्षेपकही बुक करून ठेवले आहेत. मिरवणुकीसाठी गाडी सजविण्याची काहींची तयारी सुरू आहे. मिरवणूक कशी व कोठून काढायची, याचे प्लॅन केले जात आहेत. गुलालाचेही अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. दोन्ही बाजूंनी ही तयारी लपूनछपून होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विविध वाहिन्या व समाजमाध्यमावरून संपूर्ण देशाच्या निकालाचा अवाज मांडण्यात आला. या निकालानंतर साताऱ्यातही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या चर्चाना जीर चढला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एक्झिट पोलच्या अंदाजांचे आपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. निकाल बाजूने असल तर समर्थनार्थ आणि विरोधी असेल तर तो कसा खोटा आहे. हे सांगण्यासाठीची माडणी केली जात आहे 

मतमोजणीदरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागानेही मंगळवारी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे सांगितले.

उदयनराजे भोसले यांना २०१९ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर शशिकांत शिंदे यांना विधानसभेला मात मिळाली होती. त्यानंतर दोघांचाही राजकीय संघर्ष सुरू होता. ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, दोघांचेही राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागले होते. दोघे लढलेही त्याच त्वेषाने, त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक ताढली आहे. संपूर्ण जिल्यातील नागरिकाचे लक्ष मंगळवारकडे लागले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply