Satara Earthquake : साताऱ्यासह कोयना धरण क्षेत्रात भूकंपाचा धक्का; प्रशासनानं नागरिकांना केलं 'हे' आवाहन

Satara Earthquake : साताऱ्यासह कोयना धरण परिसरात (Koyna Dam) भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का रात्री पावणेबाराच्या सुमारास जाणवला आहे. कोयना सिंचन विभागानं 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती दिली आहे.

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 24 किलोमीटर वारणा खो-यात, तर चांदोली गावाजवळ आहे. या भूकंपाचे हादरे कोयनानगर परिसरात जाणवले.

Pune Accident : कंटेनर-ट्रकचा भीषण अपघात; आगीत चौघांचा जळून मृत्यू , नवले ब्रिज परिसरातील घटना

या भूकंपाच्या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी भीती बाळगू नये, असे प्रशासनानं सांगितलं आहे. साताऱ्यातही रात्री 11 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये. मागील काही दिवसांत उत्तर भारत देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply