Satara Car Accident : विठुरायाची भेट अपूर्णच राहिली, कार अपघातात एका भाविकाचा मृत्यू; 6 गंभीर जखमी

Satara : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात  झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे. कार अपघातामुळे या भाविकांचे विठुरायाच्या भेटीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथे राहणारे काही गावकरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. बलोरो कारने हे सर्वजण पंढरपुरच्या दिशेने प्रवास करत होते. याच दरम्यान माण तालुक्यातील लोधवडेजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर कार उलटली. या अपघातामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला.

ST Bus Accident : ७० पेक्षा जास्त प्रवासी, चढावावरच एसटी बसचे ब्रेक फेल; आरडाओरड अन् गोंधळ; मलकापूर- सोलापूर मार्गावर अपघात

या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातामध्ये कल्याण भोसले या भाविकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सातारा पोलिसांकडून अपघाताच तपास सुरु आहे.

दरम्यान, आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पायी वारी पूर्ण केल्यानंतर विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये या अपघातामध्ये भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply