Satara News: MBBSच्या विद्यार्थिनीचा इमारतीवरुन पडून मृत्यू; प्रकरणात बड्या व्यक्तीचं नाव? गूढ वाढलं

Satara : मलकापूर (ता. कराड) येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडल्यामुळे जिल्ह्यात तर्कविर्तकांना उधाण आले आहे. या तरुणीबरोबरच आणखी एक वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी जखमी झाला असल्याची चर्चा कराडमध्ये सुरू आहे. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत याबाबत कराड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दुर्दैवी घटनेनंतर परप्रांतातील एका मोठ्या व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी राज्यासह देश-परदेशातील विद्यार्थी येत असतात. कराड शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात २१ वर्षीय परप्रांतीय युवती शिक्षण घेत होती. कराड शहर परिसरातील मलकापूरमध्ये एका इमारतीत ती वास्तव्यास होती. याच इमारतीवरून ही युवती मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पडून गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याच अवस्थेतच तिला रुग्णालयात नेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांकडून मोठी गुप्तता पाळली जात आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

Pooja Khedkar Update : पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय, भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी!

दरम्यान, या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची चर्चा आहे. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे. या दोन्ही घटनांसंदर्भात कराड शहर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृतरीत्या माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्या घटनेबाबतचा संभ्रम कायम आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर परप्रांतातील एका मोठ्या व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तरुणीच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, अधिकृत माहिती समोर न आल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply