Sassoon Hospital : ससून रुग्णालयातील गोंधळ अद्याप सुरूच; वैद्यकीय अधीक्षक बदला, डीन डॉ. काळे यांची मागणी

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पोरखेळ अद्याप सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधीक्षक पदासाठी नवीन डॉक्टरांची नियुक्त करण्यात आली आहे. आता हे नवनियुक्त वैद्यकीय अधीक्षक बदला यासाठी ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी शासनाला पत्र लिहिलं आहे.

ससूनचे डीन डॉक्टर काळे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहून वैद्यकीय अधीक्षक बदलण्याची मागणी ⁠केली आहे. ⁠वैद्यकीय अधीक्षक पदी शुक्रवारीच डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र यल्लाप्पा जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र नसल्याचे डीन डॉक्टर काळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Pune Crime : आईच्या ऑपरेशनसाठी फोडलं शेजाऱ्याचं घर; पळवले लाखो रुपयांचे दागिने

पत्रामधून डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. या आधी वैद्यकीय उपअधीक्षक असताना जाधव यांनी महिला सुरक्षा रक्षकाची छेड काढल्याचा आणि त्याप्रकरणी चौकशी होऊन त्यांना पदावरुन हटवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. 

तसेच, याआधी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार जाधव यांच्याकडे असताना त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. तेव्हाही जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. डॉक्टर जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठीचे पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचा ठपका डीन डॉक्टर काळे यांनी ठेवला आहे.

⁠अधीक्षक पदासाठी उमेदवाराला किमान पाच वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. मात्र जाधव यांच्याकडे तो अनुभव नाही. लवकरच भारतीय आयुर्वेद ज्ञान आयोगाकडून ससूनचे इन्स्पेक्शन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर जाधव यांची नियुक्ती अडचणीची स्थळे त्यामुळे डॉक्टर काळे यांनी जाधव यांना बदलण्याची मागणी केली आहे.

अधीक्षकपदासाठी मीच पात्र, दोन डॉक्टरांचा पदावर दावा

२२ एप्रिल रोजी डॅाक्टर यल्लापा जाधव यांना ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा भार सोपवण्यात आला. मात्र याच या पदावर दोन डॉक्टरांकडून दावा करण्यात आला होता. ⁠डॅाक्टर अजय तावरे यांच्याकडील ससून रुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी डॅाक्टर यल्लापा जाधव आपल्या सेवेत रुजू झाले. मात्र कार्यालयात वैद्यकीय अधीक्षक पदाच्या खुर्चीवर तावरे बसले होते. त्यांनी देखील आपण वैद्यकीय अधीक्षक असल्याचा दावा केला होता. यावेळी दोन्ही डॉक्टरांनी या कार्यालयात ठाण मांडलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply