Santosh Deshmukh : 'सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही'; आवादा कंपनीतील ऑफिस बॉयनं जबाबात सगळंच सांगितलं

Santosh Deshmukh : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याने मोठी कबुली दिली आहे. ९ डिसेंबर २०२४ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.

घुलेने दिलेल्या कबुली जबाबानंतर देशमुख हत्या प्रकरणात अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडत आहे. अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अशातच ऑफिस बॉयने आपल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ६ डिसेंबर २०२४ला आवादा प्रकल्प परिसरात घुलेनं गोंधळ घातला होता. तसेच देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं त्याने सांगितलं आहे.

आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब साम टीव्हीच्या हाती आला आहे. अमोल देशमुख (३९) असे ऑफिस बॉयचे नाव असून, त्याने सीआयडीसमोर आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्याने ६ डिसेंबर २०२४ ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदाराने गोंधळ घातल्याचे सांगितलं आहे.

Fake Doctor : नागरिकांनो सावधान! उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, १८ दवाखान्यांना ठोकलं टाळं

परिसरात गोंधळ सुरू असतानाच तेथे आवादा कंपनीच्या वॉचमॅनने हस्तक्षेप घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने वॉचमॅनवर हल्ला केला. याच दरम्यान सुदर्शन घुले याने "मी वाल्मीक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या.. नाहीतर कंपनी बंद करा.." अशी धमकी दिली.

या राड्यादरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख त्याठिकाणी पोहोचले. देशमुखांनी सुदर्शन घुले याला "कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या", अशी विनंती केली. मात्र, रागाच्या भरात सुदर्शन घुलेने त्याला धमकी दिली. "सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही", अशी जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान ऑफिस बॉयही उपस्थित होता. त्याने जबाबात या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply