Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट, हालहाल करून जीव घेतला, वाचून डोळ्यातून अश्रू येतील

Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ९० दिवस उलटले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना अमानूष मारहाणीचे फोटो दोषारोपत्रातून समोर आले होते. हे फोटो पाहताच लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.आता दोषारोपत्रातून देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या शरीरावर नराधमांनी कसे वार केले, याची सगळी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, संतोष देशमुख यांची हत्या ही जबर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. देशमुख यांना नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. मारहाणीमुळे देशमुख यांचं संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं. त्यांच्या शरीरावर बहुतांश भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत.

Accident : समृद्धीवर २५ जणांचा होरपळून मृत्यू, दीड वर्षांनंतरही मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत नाही

तसेच देशमुखांच्या हनुवटी, कपाळ दोन्ही गालांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. तसेच त्यांच्या पोटावर जखमा, नाकातून रक्त, छाती, गळ्यावर जखमा, बरगड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण, डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपरा, मनगट, हाताच्या मुठीवरही गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत.

मारहाणीमुळे हात, पाय आणि पोटावरही जखमा आढळल्या आहेत. मांडी, गुडघा, नडगी आणि बरगड्यांवर बेदम मारहाणीच्या जखमा आहेत. गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची पाठ काळी निळी पडली होती. नराधमांनी केलेल्या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरात दोन ते अडीच लिटर रक्त गोठले होते. त्यांना अडीच ते तीन तास मारहाण सुरूच होती, अशी माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply