Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : माउलींचे मानाचे अश्व निघाले आळंदीला; अकरा दिवसांनंतर येणार पुण्यात 

Pune : आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीसाठी जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले. टाळ-मृदंगाचा निनाद अन् माउलीनामाचा गजरात या अश्वांना अंकलीकरांनी निरोप दिला. हे अश्व तब्बल अकरा दिवसांचा प्रवास करून २६ जून रोजी पुण्यात पोचतील. त्यानंतर २८ जून रोजी ते आळंदीला पोचणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी २९ जून रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. वारीत सहभागी होण्यासाठी मंगळवारी आळंदीला निघालेल्या मानाच्या अश्वांची बेळगावमधील शितोळे अंकलीमध्ये ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली.

Pune: परदेशी नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या पु ल देशपांडे उद्यानचे गेट घेणार मोकला श्वास, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, शंकर कुन्हाडे, ज्ञानेश्वर गुळूजकर, योगेश आरू, योगीराज कुन्हाडे, सत्यवान बवले, राहुल भोर आदी उपस्थित होते. शितोळे अंकलीकर राजवाडा आणि नगरप्रदक्षिणा करून अश्व दुपारच्या विसाव्यासाठी मांजरीवाडी येथे पोहोचले. मंगळवारी (ता. १८) मिरज येथे मुक्कामी असतील.

बुधवारी (ता. १९) मिरज- सांगलीमार्गे सांगलवाडीतील राममंदिरात मुक्कामी पोहोचतील. गुरुवारी (ता. २०) तुंग, कारंदवाडी, मिरजवाडीमार्गे अश्व इस्लामपूर पेठनाका येथे, तर शुक्रवारी (ता. २१) पेठनाका, नेर्लेमार्गे वहागाव येथे अश्व येणार आहेत.

शनिवारी (ता. २२) वहागाव, उब्रजमार्गे भरतगाव येथे, तर रविवारी (ता. २३) सातारा, नागेवाडी, उडतरे, भुईज मुक्कामी येणार आहेत. सोमवारी (ता. २४) भूईज, सुरूर खंडाळामार्गे सारोळा येथे; तर मंगळवारी (ता. २५) अश्व शिदिवाडी येथे येतील. बुधवारी (ता. २६) अश्व पुण्यात दोन दिवसासाठी मुक्कामी येतील. शुक्रवारी (ता. २८) येरवडा, थोरल्या पादुकमार्गे अश्व सायंकाळी आळंदीत येणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply