Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Sanju Samson Statement : 

राजस्थान रॉयल्स संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १ धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा पराभव झाला असला तरीदेखील राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आपल्या संघातील खेळाडूंचं कौतुक करताना दिसून आला आहे. या सामन्यातील पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन? जाणून घ्या.

या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स  संघाला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजी करत आलेल्या भुवनेश्वर कुमारने रोमेन पॉवेलला LBW करत माघारी धाडलं आणि संघाला १ धावेने शानदार विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्स संघाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रियान परागने ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ४० चेंडूत ६७ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर राजस्थानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. या दोघांनी १३४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

काय म्हणाला संजू सॅमसन?

सामन्यानंतर बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, ' या युवा खेळाडूंना क्रेडिट द्यावं लागेल. त्यांनी गडबडलेला डाव सांभाळला. आम्हाला आव्हानापर्यंत पोहचवण्यात त्यांनी जबाबदारी घेऊन फलंदाजी केली. अशा स्थितीत रिस्क घ्यावी लागते. त्यांनी खरच खूप चांगली फलंदाजी केली.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्ही अनेक सामने शेवटच्या षटकात जिंकले आहेत. इथे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघातील गोलंदाजांना श्रेय द्यावं लागेल. आम्ही शेवटच्या षटकापर्यंत १० च्या सरासरीने धावा करत होतो.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply