Sanjay Shirsat : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले, पण...; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Sanjay Shirsat :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र शिंदे साहेबांनी आरक्षण दिले. त्यांच्या निर्णयावर जल्लोष झाला. एकनाथ शिंदे यांनी दिलेले आरक्षण हे ओबीसीला धक्का न लागणारे आहे. मात्र, ओबीसीला धक्का लागेल असे  काहीजण बोलत फिरत आहेत. आनंदाचे वातावरण खराब करण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांनी आरोप करतांना त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे दूर ठेवावे; असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केले आहे.

संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना आमदार यांनी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मराठा आरक्षणावर मत मांडले आहे. तसेच काही लोकांचा रोष असेल तर त्यांनी राजकीय जोडे बाहेर काढावे मग भूमिका घ्यावी. त्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. नाही ऐकले तर त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी; असे म्हणत छगन भुजबळ  यांना टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनी काय करावं हे त्यांनी बघावं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मुख्यमंत्री सर्व समाजाची एक बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतील असेही त्यांनी सांगितले. 

Lonavala News : लोणावळ्यात विषबाधेमुळे तब्बल १५० शेळ्यांचा मृत्यू ; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर

जरांगे पाटील यांना लोक पाठींबा देताय 

काही लोक मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करत होते. त्यांना एकनाथ शिंदे यांनी मारलेली चपराक आहे. मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात हा त्यांचा प्रश्न आहे. सर्व समाजासाठी भूमिका घेत असतील तर वाईट काय? एखादी भूमिका घेतली लोक पाठिंबा देतात हे त्यांना माहिती आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *