Sanjay Raut on Ajit Pawar Plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, शेवटपर्यंत… संजय राऊत यांचा धक्कादायक दावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Plane crash) होऊन 15 दिवस उलटले आहेत. अजित दादांचे अकाली निधन झाल्यानंतर राज्यातील वातावरण शोकाकूल आहे. पण हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या संशयाचं रान उठलं आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले असून याप्रकरणाची सखोल, कसून, निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. त्यांच्यासह शरद पवार गटाचे नेते तसेच अजित पवार यांच्या पक्षातीलल अनेक कार्यकर्ते, नेत्यांनीही दादाच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली आहे. यंत्रणा काम करत आहेत, तपास सुरू आहे इतकंच समोर आलंय. 15 दिवस होऊनही अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. यावरून प्रश्न विचारण्यात आला असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, तपासातून काहीही निष्कर्ष निघणार नाही असं राऊत स्पष्टच म्हणाले. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं , त्यातल्या कोणत्या मुद्यावर झाला किंवा झाला नाही, हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. अजित पवार हे ज्या विमान कंपनीच्या (VSR Company) विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीतही एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण याचा आधी तपास व्हायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *