Sanjay Raut Expulsion : सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार?

Sanjay Raut Expulsion : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षा विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्ष विरोधी पाऊले उचलणे, असा ठपका ठेवत ही कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव चिन्ह आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी घेतली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीत पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्याचबरोबर या राष्ट्रीय कार्यकारणीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत दादा भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असतील.

आता ही कार्यकारणी लवकरच खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करणार असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. परिणामी राज्यातील तत्कालीन महाविकासआघाडी सरकारचं बहुमत कमी झालं. याशिवाय शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिंदे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय राऊत यांच्याकडून वारंवार त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला जात होता. कामाख्ख्या देवीला ४० रेड्यांचा बळी द्यायचा आहे, असंही विधानही संजय राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही शिंदे गटच आहे, असा निर्वाळा दिल्यानंतर आता शिवसेनेचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. शिवसेनेतील अधिकार प्राप्त होताच, शिंदे यांनी शिवसेनेच्या त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. आता ही समिती मोठा निर्णय घेत संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply