Sanjay Raut : एकनाथ शिंदेंवर दबाव होता; स्वतःला वाचवण्यासाठी पक्ष फोडला... संजय राऊतांचा सर्वात गंभीर आरोप

Sanjay Raut : महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या नेत्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना केला होता. मुख्यमंत्री शिंदेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

" देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप होता. त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरुन ऐकण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये आपल्याला अटक होईल. अशी भिती देवेंद्र फडणवीस यांना होती," असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Abu Azm : मोठी बातमी! अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!

पुन्हा चौकशी करु..

तसेच प्रविण दरेकरांवर मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप होता. गिरीश महाजन यांच्यावर काय आरोप आहेत पहा? पोलिसांनी तपास करु नये, असे तुमचे म्हणणे आहे का? असे म्हणत केंद्रात सरकार येईल, त्यानंतर या फायली पुन्हा उघडू, सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी होईल, असा इशाराहीसंजय राऊत यांनी दिला.

CM शिंदेंवर गंभीर आरोप!

त्याचबरोबर "अटकेच्या भितीने देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर दबाव आणला. एकनाथ शिंदेंना  का अटक होणार होती हे विचारा? एकनाथ शिंदेंना अटकेची भिती दाखवण्यात आली. ४० आमदार आणा अन्यथा अटक करु, असा त्यांच्यावर दबाव होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी पक्ष फोडला," असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply