Sanjay Raut : PM मोदींचा सरकारी पैशांतून प्रचार दौरा, हाच मोठा भ्रष्टाचार; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून विरोधकांवर टीका करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दौरा २५ कोटींचा असतो. ते सरकारी पैशांतून भाजपचा प्रचार करत आहे. हाच मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाही. आता निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात किंवा देशात किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात. देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात, त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. प्रचारासाठी तसे गेले तर, सरकारी विमान आणि पाऊसफाटा घेऊन तर निवडणूक आयोगाने त्या संदर्भातील खर्चाचा बिल त्यांना पाठवायला हवा.

Buldhana News : बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा! एलसीबीची कारवाई, ३१ हजार लिटर साठ्यासह ३४ लाखांचा मुद्धेमाल जप्त

त्या पक्षाच्या खात्यातील ते पैसे वसूल केले पाहिजे'.'नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमानात सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत. घोषणा करत आहेत, त्यांचा एक-एक दौरा हा 25-25 कोटींचा असतो, असे ते म्हणाले.

'आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का? म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससाठी... नोटीसा फक्त आम्हालाच देणार का? प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे आणि प्रचाराला उतरले आहेत. सरकारी यंत्रणा घेऊन हा भ्रष्टाचार नाही का, मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप मोदींनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply