Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीशिवाय..."

Sanjay Raut : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीकडून जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीबाबत खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. वंचित बहुजन आघाडी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याशिवाय जागावाटप होणार नाही, असं राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

जागावाटपासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल. अनेकांनी आपले प्रस्ताव दिलेले आहेत. एकत्र बसून आम्ही आकडे डिक्लेअर करू. जागावाटपाचे सध्या येत असलेले आकडे नेमके कोठुण येत आहेत हे मला माहिती नाही. प्रकाश आंबेडकरांसह उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये वंचितचे प्रस्ताव ऐकले जातील, असंही राऊतांनी यावेळी म्हटलं.

Sambhaji Bhide : मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड

महावीकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला शिवसेना २० एनसीपी १८ काँग्रेस १० असा ठरल्याचं म्हटलं जातंय. यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी म्हटलं की, जागावाटपा संदर्भात सकारात्मक निर्णय होईल. मात्र कोणीही येतं आणि नवीन नवीन आकडे देतं, त्याच्याशी आमचा संबंध नाही. वंचित बहुजन आघाडी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या बारामतीमधील आमंत्रणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे. ज्या विद्याप्रतिष्ठान ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सरकारचा एक प्रोटोकॉल असतो कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवत असल्यास त्या ठिकाणच्या विद्यमान खासदारांना आमंत्रण दिले जाते. कारण हा एक सरकारी कार्यक्रम आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply