Sanjay Raut : निवडणूक आयोगावर विश्वास नाही, लोकशाहीवरचा विश्वास आज पूर्णपणे उडून गेला; संजय राऊतांची उद्विग्न प्रतिक्रिया

Sanjay Raut : देशात लोकशाही उरलेली नाही. सर्व स्वायत्त संस्था आज गुलाम बनल्या आहे. आम्ही कायदेशीर लढाई सुरुच ठेवू. माझा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. लोकशाहीवरचा विश्वास आज पूर्णपणे उडून गेला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

आजचा निकाल म्हणजे खोक्यांचा विजय आहे. हा निकाल विकत घेतला असून खोक्यांचा वापर कुठेपर्यंत झाला हे समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी उभारलेला पक्ष 40 बाजारबुणगे येतात आणि पक्ष विकत घेतात हे लक्षात ठेवलं जाणार, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास गमावला आहे. स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे हे दिसून आलं. स्वायत्त संस्था गुलाम असल्यासारखं वागत आहेत. असंही संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह वेगळा गट निर्माण केली. शिंदे गटाने शिवेसना न सोडता पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला होता. आम्हीच शिवसेना पक्ष आहोत असं ते सातत्याने सांगत होते. त्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची? याची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरु होती.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply