Sanjay Raut : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, राहिले का? एकनाथ शिंदेंच्या शपथेवरुन राऊतांचा बोचरा वार

  Sanjay Raut : दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणानंतर आता त्यावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात  आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा आरक्षण  देणार असल्याची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शिवसेनेत राहणार होते, पण राहिलेत का? असा खडा सवालच राऊत यांनी केला आहे.  

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.  एकनाथ शिंदे यांचे भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होते. भाजपच्या संपर्कात आल्याने खोट्या शपथांचे प्रमाण वाढले असल्याचा टोला त्यांनी लगावला. शपथा कसल्या घेता, बाळासाहेबांशी गद्दारी करता..महाराजांच्या महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसता आणि शपत काय घेता असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना स्वतःचा आचार विचार नाही. जे भाजप सांगत आहे ते करत आहे. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते ते आता शिवसेनेत राहिले का असा बोचरा सवाल त्यांनी केला.  भारतीय जनता पक्ष आमचा छळ करते त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारे हे आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

Pune : पिझ्झा डिलिव्हरीला उशिर, ग्राहकाचं अमानुष कृत्य, पुण्यात चाललंय काय?

पालघर हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बदनामीचा कट

महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर हत्याकांड झाले नाही का, असा प्रश्न राऊत यांनी केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीचा कट होता, असा दावाही त्यांनी केला. अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचे प्रकरण वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक साधूंवरहल्ले झाले. हत्याकांड झाले, त्यावर तुमची का दातखिळी बसली असेही राऊत यांनी म्हटले. 

...म्हणूनच आमचा जळफळाट

महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे . महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे जळफळाट होत असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

शिमगा हा हिंदू सण नाही का?

शिमगा हा हिंदू सण नाही का? असा उलट प्रश्न राऊत यांनी केला. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचा मेळावा नसून शिमगा मेळावा असल्याची टीका केली होती. त्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला नको आहे का? होळी, दिवाळी नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही  महाराष्ट्रात सुरू करणार आहेत का असेही राऊत म्हटले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply