Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांच्या संपत्तीत काेट्यावधींची वाढ, प्रतिज्ञापत्रात कर्जाचाही उल्लेख

Sanjay Mandlik : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक  यांनी पुन्हा एकदा लोकसभेला शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या पाच वर्षात मंडलिक यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

खासदार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी आहे. तर व्यवसायाने शेतकरीअसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरणपत्र जोडले आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांत जमा करावी लागणार महत्वाची माहिती

खासदार मंडलिक यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख, 32 हजार 525 असून तसेच 13 कोटी 21 लाख 95 हज़ार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद आहे. खासदार मंडलिक यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसून मंडलिक यांनी आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत.

गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता 9 कोटी 71 लाख 71 हजार रुपये इतकी होती. ती आता वडीलोपार्जित मालमत्तेसह 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता 7 कोटी 61 लाख रुपयांनी वाढली आहे.

खासदार मंडलिक यांच्याकडे वारसाप्राप्त मालमत्ता

९ कोटी २० लाख ९१ हज़ार ५२० रुपये.

३ कोटी ४१ लाख १८ रुपयांचे कर्ज.

स्कोड़ा,ऍक्टिव्हा वाहन.

३५ लाख ९२ हज़ार ५০০ रुपये किंमतीचे सोने.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply