Sangola News : सांगोल्याचा पुन्हा मीच आमदार होणार, शहाजी पाटील यांचा दावा

Sangola News : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक आहेत.

विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाईट वॉश दिला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणूकीच्या निकाला नंतर शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा करुन शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. 

Unseasonal Rain : कोकणाला पावसानं झोडपलं! आजही मुसळधार पावसाचा अंदाज; आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता

पंढरपूर - सांगोल्याचा पुन्हा मीच आमदार; शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचा मोठा दावा

''मी आमदार आहेच, पुढे पण मीच आमदार राहणार, पण माझा सोबत दीपक साळुंखे हे देखील आमदार होतील'', असे विधानसांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आज सांगोल्यात केले. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील यांनी हे विधान केले आहे. मात्र पुन्हा आमदार होणार असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांचा सूतगिरणी निवडणुकीत शहाजी बापू पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सुपडा साफ केला. 

ही निवडणूक जिकल्यानंतर बाबासाहेब देशमुख म्हणाले आहेत की, सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो, हे मी सांगण्याची गरज नाही. राजकारणामध्ये सातत्याने निवडणुका होत जातात. निवडणुकीमध्ये कोणालाही छोटं किंवा कमी समजणं हे चुकीचं आहे, परंतु आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोला मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार शंभर टक्के लाल बावटा फडकवल्या शिवाय राहणार नाही विश्वास ही त्यांनी व्यक्त केली आहे.‌  



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply