Sangmner Crime : पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत अडीच लाखांची लूट

Sangamner Crime News : बंदुकीचा धाक दाखवत साकुर पेट्रोल पंपावर रविवारी अडीच लाखांची लूट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील एका पेट्रोल पंपावर रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पैसे मोजण्याचे काम कर्मचारी करत होते. त्यावेळी अज्ञात तीन ते चार दरोडेखोर पंपाच्या कार्यालयात घुसले.

त्यातील एकाने पैसे मोजत असणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदूकीचा धाक दाखविला. त्यानंतर तेथील पैसे घेऊन पळ काढला. या घटनेत सुमारे अडीच लाख रुपये गेल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान घारगावमध्ये रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर दराेडेखाेरांनी साकुरकडे त्यांचा माेर्चा वळविला. त्यात ते यशस्वी झाले. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *