Sangli News : म्हैसाळ कालव्यात पोहण्यासाठी उतरले; बाहेर आलेच नाही, दोन जिवलग मित्रांचा दुर्देवी अंत

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात तीन तरुण बुडाले. ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले. मात्र, इतर दोन तरुण वाहून गेले. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. 

सलमान शौकत तांबोळी (वय २१ वर्ष) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय १६ वर्ष) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी (वय १८) असं वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हे तीनही तरुण माधवनगर येथील रहिवासी असल्याचं कळतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत तिघे तरुण वाहनचालक आहेत. मंगळवारी दुपारी एक भाडे घेऊन ते बेडग परिसरात आले होते. भाडे सोडून झाल्यानंतर सदर तिघेजण बेडग येथे आले. यावेळी म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.

दरम्यान, तिघेही तरुण पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तिघेही अचानक वाहू लागले. तरुण पाण्यात बुडल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या दिशेने धाव घेतली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे यातील नदीम मुलाणी नामक तरुणाला वाचविण्यात यश आले.

मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने इतर दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आता या बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply