Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात मुसळधार; कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर, काही गावांचा संपर्क तुटला

Sangli : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीला (Krishna River) देखील पूर आला आहे. मागील चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीत सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे.

Pune Crime: हातोडा घेतला अन् थेट आचाऱ्यावर वार, नाक फुटलं अन्... पुण्यात लेबर कॅम्पमध्ये हादरवणारी घटना

बुर्ली, आमणापूर, धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिके देखील पाण्याखाली गेली आहेत. तसेच आमणापूर येथील स्मशानभूमीत देखील नदीचे पाणी शिरले आहे. मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढलेला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply