Sangli District Bank : जिल्हा बँकेकडून कर्जदारांना जप्तीची नोटीस; वसुलीसाठी सांगली जिल्हा बँक ऍक्शन मोडवर

 

 

Sangli : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक वर्ष संम्पन्यासाठीचा कालावधी कमी असल्याने थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा बँकेकडून घरबांधणीसह शेतीचे दीर्घ मुदतीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने तब्बल ६० कर्जदारांना आठ कोटी ३५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सिक्युरिटीजेशन अँक्ट अंतर्गत नोटीस बजावली आहे.

जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती संस्थांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यानुसार सांगली जिल्हा बँकेकडून देण्यात आलेल्या शेती कर्जाची वसुली नियमित असली, तरी वैयक्तिक आणि बिगर शेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. आर्थिक वर्ष अखेरच्या टप्पात अर्थात मार्च एंडिंग जवळ येत असल्याने वसुली आवश्यक आहे. यामुळे जिल्हा बँक थकीत कर्ज वसुलीसाठी आता ॲक्शन मोडवर आले आहे

Dharangaon Crime : वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला; गिरणा नदीत मध्यरात्रीची घटना

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२५ अखेर बँकेने विक्रमी नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे थकबाकी वसुलीवर आता विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेती कर्जाची नियमित वसुली सुरू आहे. मात्र बिगर शेती कारणांसाठी केलेल्या कर्ज पुरवठा आहे. यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था उद्योजक व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे असलेली थकीत रक्कम वसुली करणे आवश्यक आहे.

जिल्हा बँकेने घरबांधणी आणि अन्य कारणांसाठी वैयक्तिक कर्ज पुरवठाही केला आहे. यातील ६० कर्जदारांचे तब्बल आठ कोटी ३५ लाख रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने आक्रमक पवित्र घेऊन संबंधितांना नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे कर्जाची थकलेली रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply