
Sangli : भाजपमध्ये दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दुष्काळी फोरम’ या नावाने दबाव गटाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा समावेश आहे. या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या गटाच्या आधारे मोर्चेबांधणी करणार आहेत. हा ‘दुष्काळी फोरम’ म्हणजे महायुतीतील असंतुष्ट गटाची वेगळी चूल समजली जात आहे.
राज्यात विकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील हेच विकास कामाचा निधी आपापल्या मतदारसंघात पळवत असल्याचा आरोप करत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘दुष्काळी फोरम’ची स्थापना करण्यात आली होती. या फोरमने मोदी लाटेवेळी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सांगली लोकसभेच्या निवडणुकीत सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर जिल्हा परिषद, महापालिका या भाजपच्या ताब्यात येण्यासाठी या गटाचे मोठे योगदान होते.
|
|
मात्र, पक्षाध्यक्ष बदलल्यानंतर या वेळी खासदारपदाचा उमेदवार बदलावा यासाठी आग्रह होता. मात्र, तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनाच पक्षाने संधी दिल्याने या गटाने लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली. यातून सांगली लोकसभेवेळी भाजपला पराभूत व्हावे लागले. जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देऊन, तर घोरपडे यांनी उघडपणे खासदार विशाल पाटील यांचा प्रचार केला. यानंतरही पक्षाने नाराजी दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. यातून ‘दुष्काळी फोरम’ पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दुष्काळी फोरम हा विकासासाठी दबाव गट म्हणून काम करणार असून, पक्षनिरपेक्ष भूमिका घेणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतच हा गट प्रभावीपणे काम करणार असून, जो आमच्या भूमिकेशी संबंधित असेल त्याच्या पाठीशी ताकतीने राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोरमची व्यापक बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असून, या वेळी फोरमची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. -माजी आमदार विलासराव जगताप
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

