
Sangli : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन हानी झाली आहे. प्रामुख्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पूर्व भागात मागील आठवडाभर पाऊस सुरू आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. यात डाळींब, बाजरी, भुईमूंग व तूर पिकांची मोठी हानी झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. बोरनदी दुथडी वाहत असल्याने पूरसदृश स्थिती आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले असल्याने उभ्या पिकात, फळबागेत पाणी थांबले आहे.
हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी बोर्गी, बालगाव येथे तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद, सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा, मका पिकाचे नुकसान झाले आहे. जत पूर्व भागात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरी शेती पिकांचे तर डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
उमदी भागात अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून मका, तूर, भुईमूग, मूग, बाजरी पिकांची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल; या आशेने शेतकरी होते. मात्र परतीच्या पावसाने सगळेच नष्ट केले आहे. तर जत तालुक्यात आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

