Sangli Crime : विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून वाद; तिघांनी मिळून केली तरुणाची हत्या, गावात तणाव

Sangli : अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूकीत नाचण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून तिघांनी मिळून तरुणावर चाकू हल्ला करत खून केल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार सांगलीच्या अंकलीमध्ये घडला आहे. शीतल पाटील (वय २५) असे घटनेत मृत तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या वादातून शीतल पाटील याच्यावर तिघांनी चाकू हल्ला केला होता. ज्यामध्ये शितल पाटील हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

संशयितांच्या घरासमोर मृतदेह ठेवत ग्रामस्थांचे आंदोलन

दरम्यान उपचार सुरू असताना शीतल पाटील यांच्या मृत्यू झाला. मृत्युच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेलेला मृतदेह संशयित आरोपींच्या घरासमोर आणून ठेवत आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे गावात तणावाचं नाव वातावरण निर्माण झाले होते. संशयितांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत अंत्यविधी न करण्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.

तिघे संशयित ताब्यात

गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलीस गावात दाखल झाले होते. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल; असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने तणाव निवळला आहे. यानंतर देखील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत असून या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *