Sangli : चक्क पाणी पिताना शेळ्यांनी गिळले सोन्याचे दागिने; शस्त्रक्रिया करत काढले चार ग्रॅम वजनाचे कर्णवेल

Sangli : शेतकऱ्याने शेळ्यांचे पालन केले होते. घराच्या बाजूलाच या शेळ्यांना बांधून ठेवण्यात येत असते. दरम्यान ताटात असलेले पाणी पिताना दोन शेळ्यांची त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने देखील गिळून घेतले. यामुळे दागिने काढण्यासाठी शेतकऱ्याने रुग्णालयात जात शस्त्रक्रिया करून सोन्याचे दागिने काढून घेतले. हा सर्व प्रकार मिरज तालुक्यातील सोनी या ठिकाणी घडला आहे. यामुळे शेळीपालक शेतकऱ्याचे नुकसान टळले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील सोनी येथील प्रकाश गाढवे यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. दरम्यान गाढवे यांच्या मुलीने तिच्या कानातील चार ग्रॅम वजन असलेले दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते. ज्यामध्ये पाणी टाकून ठेवले होते. दरम्यान त्यांनी पालन केलेल्या घरात असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील पाणी पीताना सदरचे सोन्याचे दागिने असणारे कर्णवेल देखील गिळून घेतले.

पुण्यात MIT मध्ये दुर्घटना, हॉस्टेलमध्ये महिलेचा मृत्यू, लोणी काळभोरमध्ये हळहळ

शस्त्रक्रिया करत काढले दागिने

शेळ्यांची पाणी पिताना कर्णवेल गिळून घेतल्याचा प्रकार घरातील कुटुंबियांच्या लक्षात आले. काही केल्या शेळ्यांची गिळलेले दागिने निघणार नव्हते. यामुळे गाढवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पशु वैद्यकीय डॉक्टरांनी दोन्ही शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन- दोन ग्रॅमचे सोन्याची कर्णवेल यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली आहे.

४० हजार रुपयांचे नुकसान वाचले

शेळ्यांची गिळलेल्या कर्णवेलांची आजच्या सोन्याच्या दरानुसार ४० हजार रुपये इतकी किंमत होती. शस्त्रक्रिया करून दागिने काढण्यात आल्याने शेतकऱ्याचे नुकसान टाळले आहे. दरम्यान तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply