Koyna Dam : कोयना, चांदोली धरणातून सिंचनासाठी यंदा ५४ टीएमसी पाणी; चार महिनेच चालणार आवर्तन

 

Sangli : कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी ५४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध साठा १०० टक्के उचलता येणार नाही. मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे. परिणामी पुरून उरेल इतके पाणी हाताशी आहे. केवळ एप्रिल मे मध्ये आवर्तनाच्या फेऱ्यामधील ताण टाळण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाला पेलावे लागणार आहे.

धरणांमधील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाटचाऱ्यांद्वारे पाणी सोडण्यात येत असते. प्रामुख्याने रब्बीच्या हंगामात धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असते. त्यानुसार काही भागांमध्ये आवर्तन सोडण्यात आले आहे. आता कोयना व चांदोली धरणातून देखील सिंचनासाठी आवर्तन सोडले जाणार आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा धरणात चांगला पाणीसाठा आहे. यामुळे यंदा ५४ टीएमसी पाणी सिंचनासाठी दिले जाणार आहे.

Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी

चारच महिने सुटणार आवर्तन सांगलीच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना मधून शेतकऱ्यांनी अद्याप पाणी मागणी नोंदवली नाही. पाटबंधारे विभागाने पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन चालवले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आवर्तन नियमित सुरू होतील; अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे चारच महिने यंदा आवर्तन चालणार आहे. यानंतर मात्र शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार नाही.

मागणी केल्यास कर्नाटकमध्येही पाणी

तसेच चांदोली धरणातून ११.५४ तर कोयना धरणातून ४२.७० टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यंदा तो पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे. मात्र वास्तवात पाणी शिल्लक राहील अशी परिस्थिती आहे. परिणामी कर्नाटक सरकारने एप्रिलमध्ये मागणी केल्यास यंदा महाराष्ट्रातून पाणी उपलब्ध करून दिले जाऊ शकते अशी स्थिती आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply