Sangli : संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका

Sangli : संजय राऊत यांच्या अंगात आले आणि आमचे सरकार आले, मात्र राऊतांच्या अंगात आलेल उतरलेच नाही. त्यामुळे आमचे महाविकास आघाडीचे सरकार गेले या शब्दात काँग्रेसचे आ. डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव तालक्यातील प्रचार सभेत बोलताना राऊत यांच्यावर खोचक टीका केली.

लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि कॉंग्रेस पक्षादरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघावरून टोकाचे मतभेद झाले होते. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आघाडीचे अधिकृत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत डॉ. कदम आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत देखील डॉ. कदम यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर हल्ला चढवत महाविकास आघाडीचे सरकार जाण्यास त्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे या दोन पक्ष आणि नेत्यांमधील कलगीतुरा आता विधानसभेला सुरू झाला आहे.

Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

आ. डॉ. कदम पलूस-कडेगाव मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या वेळी प्रचार सभेत बोलताना आ. कदम म्हणाले, की गेल्या वेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असे वाटत नव्हते. मी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत याच्या अंगात आले आणि सरकार आले. पण अडचण एवढी झाली की राऊताच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यांच्यामुळेच आमचे महाविकास आघाडीचे राज्यात आलेले सरकारही गेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply