Sangli | सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा

शक्तिपीठ महामार्गाला विविध जिल्ह्यांमधून जोरदार विरोध होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्च्यात शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह बैलगाड्यांमध्ये सहभाग घेतला. मोठ्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सामील झाले होते. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत पोस्टर हातात धरून थेट बैलगाडीतून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या या मोर्चामार्फत शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रशासनाकडे आपली मागणी मांडली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *