Sandeep Deshpande Attack :  संदीप देशपांडे हल्ल्यात आदित्य ठाकरे, संजय राऊतांचं नाव घेतलं; मनसे नेत्याच्या आरोपांनी खळबळ

Sandeep Deshpande Attack: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हल्लात संदीप देशपांडे जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपाचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्यात संदीप देशपांडे किरकोळ जखमी झाले.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अमेय खोपकर म्हटले की, 'आमच्या सहकाऱ्यावर झालेला हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. या प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हायला हवी. संदीप देशपांडे यांनी पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढले. आमच्या सहकाऱ्यावर झालेला हल्ला आम्ही खपवून घेणार नाही'.

'संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हायला हवी. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी. आम्ही शांत बसणार नाही… उत्तर नक्की मिळेल, असे अमेय खोपकर पुढे म्हणाले.

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे'.

'काल अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्यात दिवसाढवळ्या झालेली मारामारी झाली. यात मारामारीमध्ये जिल्हाप्रमुख गंभीर जखमी झाले. हे सगळे ज्या पद्धतीने घडत आहे, यावरून एकूण गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस कमकुवत ठरत आहेत का, असेच म्हणावे लागेल', अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply