Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर मिनी बसला भीषण अपघात; देवदर्शनाहून परतताना 12 भाविकांचा मृत्यू, 23 जखमी

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune News : पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, ११ जणांची चौकशी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला.

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  

अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

मात्र अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 12 जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य 23 जण जखमी झाले.

काही जण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांनाअधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply