Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अवजड ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला

Amravati News : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याचं नाव नाही. आज समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला आहे. महामार्गावरून ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी झाले आहेत. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *