
Samruddhi Mahamarg Accident : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. दररोज महामार्गावर दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात घडत आहेत. एकीकडे परिवहन विभाग अपघाताचं प्रमाण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे मंगळवारी समृद्धी महामार्गावरील बुलडाण्याजवळ कारचा भयानक अपघात झाला.
या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
|
Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात! दोघांचा मृत्यू; ७० जण जखमी |
समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात
समृद्धीवरील नागपूर कोरीडॉरवर सिंदखेडराजा नजीक चॅनेल क्रमांक ३३५ वर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार नागपूरवरून नाशिकच्या दिशेने निघाली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार सिंदखेडराजाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
काही कळण्याच्या आत कार अनिंयत्रित होऊन दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं.
उद्घाटनापासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या ७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच ३५८ अपघात घडले असून, यात ३९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्वाधिक १०४ अपघात चालकाला डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीच्या सलग प्रवासाने थकल्यामुळे घडले आहेत, असे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

